“आझादी का अमृत महोत्सव” निमित्ताने मालवणात गुरुवारी रक्तदान सोहळा आणि आरोग्य मेळावा
आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने आयोजन
कुणाल मांजरेकर
मालवण : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग व ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने गुरुवारी २१ एप्रिल रोजी रक्तदान सोहळा व मोफत आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत रक्तपेढी ओरोस जिल्हा रुग्णालय यांच्या सहाय्याने रक्तदान शिबिर होणार आहे. तर सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत ग्रामीण रुग्णालय मालवण येथे भव्य मोफत आरोग्य मेळावा होणार आहे. या आरोग्य मेळाव्यात बालरोग, हृदयरोग, स्त्रीरोग, अस्थिव्यंग, पोटाचे आजार, कान नाक घसा, डोळ्यांचे विकार, दंतरोग, योगा, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, एच.आय.व्ही-एड्स तपासणी व समुपदेशन यावर तज्ञांद्वारे मोफत तपासणी करण्यात येईल. तसेच PM-JAY अंतर्गत आयुष्यमान कार्ड व युनिक हेल्थ कार्ड वितरण करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी शिधापत्रिका, वैध ओळखपत्र (आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक), पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी राजेश पारधी 9370034974, मुकेश बावकर 9422096903, निलेश गवंडी 9421456857, अमेय देसाई 9404535273, सौ. नेहा कोळंबकर 9404920366, सौ. राधा केरकर 9021163580, विकास पांचाळ 8793346983, आतू फर्नांडिस 9404753033, अंकुश कातवणकर 9923823906 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.