कुडाळ प्रमाणेच मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी नगरपालिकेत आपला नगराध्यक्ष बसवण्यासाठी प्रयत्न करा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सूचना : काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आणखी कोण येणार असेल तर सोबत घेण्याची सूचना

काँग्रेसचे अरविंद मोंडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर यांनी मुंबईत ना. गायकवाड यांची घेतली भेट

कुणाल मांजरेकर

मालवण : राष्ट्रीय काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव काका कुडाळकर यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यां मार्फत एकत्र येऊन जिल्ह्यातील प्रश्नांना न्याय देण्याच्या होत असलेल्या प्रयत्नांचे ना. गायकवाड यांनी कौतुक करून भविष्यात आपल्या सोबत अजून कोणी येणार असतील तर त्यांनाही एकत्र घ्या. तसेच कुडाळ नगरपंचायत प्रमाणे येणाऱ्या मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपालिका निवडणूकीत आपला नगराध्यक्ष बसवण्यासाठी प्रयत्न करा. या निवडणूकांसाठी आपण स्वतः जिल्ह्यात दौरा करू, असे ना. गायकवाड यांनी म्हटल्याची माहिती अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

अरविंद मोंडकर व काका कुडाळकर यांनी ना. गायकवाड यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी त्यांच्या विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या आहेत.
सवलतीचे क्रीडा गुण इंटरमिजिएटचा आधार घेऊन देण्यात येणार असल्याने मुलांनाही त्याचा आधार मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अश्या योग्य निर्णयासाठी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबई काँग्रेसच्या वडाळा येथील नगरसेविका पल्लवी मुणगेकर यांचे पती मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी महेंद्र मुणगेकर देखील उपस्थित होते

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!