आंबेडकर जयंतीनिमित्त मालवणात विविध उपक्रम : दीपक पाटकर यांचा पुढाकार

भाजपा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंबेडकर जयंती साजरी

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून मालवणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गुरुवारी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. आंबेडकर जयंती निमित्त बांगीवाडा न. प. कर्मचारी वसाहती नजीक समाज मंदिरात शीतपेय वाटप करण्यात आले. तर बसस्थानक मागील समाज मंदिरात टी शर्ट आणि लाडू वाटप करण्यात आले. दरम्यान, भाजपा कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

भाजपा कार्यालयात प्रभारी शहर अध्यक्ष विजय केनवडेकर, आबा हडकर, भाई मांजरेकर, भाऊ सामंत, महेश सारंग, राजू बिडये, पंकज पेडणेकर, बाळू मालवणकर, बाबू कासवकर आदी उपस्थित होते. तर बांगीवाडा न. प. कर्मचारी वसाहतीमधील समाज मंदिरात बाळा जाधव, वैभव वळंजू, सागर जाधव, सुमित जाधव, जीवन जाधव आदी उपस्थित होते. तर बसस्थानक मागील समाज मंदिरात नरेश वायंगणकर, सदा मालवणकर, हेमंत वायंगणकर, प्रकाश देऊलकर, पुरुषोत्तम मालंडकर, विलास देऊलकर, महेश जाधव, गीतेश जाधव, किशोर मालवणकर, चंद्रहास मालवणकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!