सुन्नत जमातुल मुस्लिम मालवण तालुकाध्यक्षपदी हसरत खान

उपाध्यक्षपदी एजाज मुल्ला, सचिवपदी जाबीर खान तर खजिनदारपदी शकील शेख यांची निवड

कुणाल मांजरेकर

मालवण : सुन्नत जमातुल मुस्लिम मालवण तालुक्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून हसरत खान यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी उपाध्यक्षपदी एजाज मुल्ला, सचिवपदी जाबीर खान व खजिनदार शकील शेख यांची निवड झाली आहे, 

मालवण जामा मस्जिद येथे संघटनेची कार्यकारणी बैठक संपन्न झाली. यावेळी मालवण तालुक्यातील बहुतांशी मुस्लिम बांधव उपस्थित होते. या नूतन कार्यकारणीत सभासद म्हणून बशीर अतनिकर, बाबा मुकादम, बखतीयार खान ऑडिटर, नजीर साठे, सलाम मुजावर, अब्दुल गणी मुकादम, साजिद बांगी, रफिक शेख काम पाहणार आहेत. जामा मस्जिद येथे सुन्नत जमातुल मुस्लिम माजी अध्यक्ष कैसर पठाण यांनी नूतन अध्यक्ष हसरत खान यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. यावेळी नूतन अध्यक्ष हसरत खान, माजी अध्यक्ष कैसर पठाण, बक्तियार खान, जाबीर खान, इंतु शेख, सलीम खान, सुहेल नालबंद, एजाज मुल्ला, बशीर अतनिकर, रफिक शेख आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!