अखेर गवंडीवाड्यातील वीज पुरवठा सुरळीत ; अमेय देसाईंसह नागरिकांची तत्परता

मंगळवारी रात्रीच्या अवकाळी पावसात आंब्याचे झाड कोसळल्याने वीज वाहिन्या झाल्या होत्या नादुरुस्त

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण शहर आणि परिसराला मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला. यावेळी गवंडीवाडा येथील आशा पार्क नजीक आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्याने येथील वीजेचा पोल वाकून विद्युत वाहिन्या रस्त्यावर पडल्या होत्या. परिणामी गवंडीवाडा परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या सहाय्याने कटर मशीनचा वापर करीत येथील रस्ता आणि वीज वाहिन्या मोकळ्या केल्या. यानंतर येथील वीज पुरवठा सुरळीत झाला. अमेय देसाई आणि नागरिकांनी दाखवलेल्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

मालवणमध्ये मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे गवंडीवाडा – भरड रस्त्यावर आशापार्क कडील मेस्त्री यांचे आंब्याचे झाड कोसळले. त्यामुळे तेथील वीजेचा पोल वाकून विद्युत तारा जमिनीवर पडल्या होत्या. त्यामुळे गवंडीवाडा भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी येथे धाव घेत नागरिकांच्या सहाय्याने तसेच कटर मशीनचा वापर करून रस्ता व विद्युत तारा मोकळ्या केल्या. यानंतर महावितरणचे वायरमन गोलतकर, मडव, वस्त, लुडबे यांनी विद्युत तारा व पोल नागरिकांच्या साहाय्याने सुस्थितीत करून वीज पुरवठा चालू केला. यावेळी अमेय देसाई, विठ्ठल मेस्त्री, अनिकेत आंब्रडकर, प्रशांत सोनारवाडकर, वाघ, चंदन जाधव, तुषार मेस्त्री, केदार देसाई तसेच इतर नागरिकांचे सहकार्य लाभले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!