अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करा

मालवण तालुका शिवसेनेची मागणी ; नायब तहसीलदारांना निवेदन सादर

मालवण : मालवण तालुक्यातील वादळी वारे व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून त्याबाबतचे पंचानामे करण्याची मागणी मालवण तालुका शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांना बुधवारी दिले.

यावेळी माजी नगरसेवक पंकज सादये, किरण वाळके, सन्मेष परब, नरेश हुले, उमेश मांजरेकर, तपस्वी मयेकर, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, दत्ता पोईपकर, मनोज लुडबे, प्रसाद आडवलकर, दिपा शिंदे आदी उपस्थित होते. अचानक वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मालवण तालुक्यातील शेतकरी, आंबा बागायतदार यांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील राहती घरे, गोठे, मच्छीमार बांधव तसेच शेतकरी बांधवांचे, आंबा बागायतदार यांच्या झालेल्या नुकसानीचे संबधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे त्वरीत आदेश द्यावेत व संबधित अहवाल शासनास पाठवून भरीव मदतीची मागणी करावी, अशी मागणी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!