“त्या” मारहाण प्रकरणी चौघा संशयितांची निर्दोष मुक्तता

मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा होता आरोप ; संशयितांच्यावतीने ॲड. स्वरुप पई यांचा युक्तिवाद

मालवण : तळगाव पेडवेवाडी येथील एका व्यक्तीस जमिनीच्या वादातून शिवीगाळ करून बांबुच्या दांडयाने व हाताच्या ठोशांनी मारहाण केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी प्रभाकर भाऊ दळवी, अभिषेक प्रभाकर दळवी, राजेंद्र रमाकांत दळवी व श्रीकांत बळवंत दळवी (सर्व रा. तळगाव पेडवेवाडी, ता. मालवण) यांची मालवण न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले.

याबाबतची फिर्याद २१ जानेवारी २०१८ रोजी मालवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या मारहाणीत फिर्यादीच्या हातास फॅक्चर झाल्याचे म्हटले होते. याबाबत पोलीसांनी तपास करून संशयित आरोपींविरूध्द भारतीय दंड विधान कलम ३२५, ३२४, ३२३, ५०४, ५०६ यासह ३४ या गुन्ह्याखाली मालवण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. सरकार पक्षाने याकामी एकूण ४ साक्षीदार तपासले. मात्र फिर्याद दाखल करण्यास झालेला विलंब, फिर्यादीचे व साक्षीदारांचे जबाबातील विसंगती व तपासकामातील त्रुटी विचारात घेवून मालवण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चारही संशयित आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!