राणेंच्या पुढाकारातून नवी दिल्लीत ७ ते ९ एप्रिलला भरणार “कोकण महोत्सव”

जिल्ह्यातील ४० उद्योजकांना स्टॉलसाठी मिळणार संधी ; येण्या जाण्याचा खर्च “एमएसएमई” मार्फत

कुणाल मांजरेकर

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथे ७ ते ९ एप्रिल रोजी “कोकण महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० स्टॉल्सना संधी मिळणार असून त्यांचा येण्या जाण्याचा खर्च केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालय (एमएसएमई) च्या वतीने करण्यात येणार आहे.

कोकणातील स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे हा कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ना. नारायण राणे यांनी खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० उद्योजकांना आपल्या उत्पादनाचे स्टॉल दिल्ली येथे या महोत्सवात उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी जाण्या येण्याचा सर्व खर्च MSME करणार आहे. तसेच बरोबर घेऊन जाणारे साहित्य त्याचीही प्रवास व्यवस्था करण्यात येणार आहे. उद्योजकांची निवास आणि जेवणाची सोय देखील केली जाणार आहे. तरी इच्छुक उद्योजकांनी 8087725255 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि उद्योग व्यापार आघाडी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4255

Leave a Reply

error: Content is protected !!