कामगारांच्या न्यायहक्कांसाठी “शिवप्रहार” संघटनेची स्थापना !
भाजपा नेते निलेश राणेंची घोषणा ; १० एप्रिल रोजी नारायण राणेंच्या वाढदिनी होणार स्थापना
कुणाल मांजरेकर
भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे कामगार संघटनेत एन्ट्री करणार आहेत. येत्या १० एप्रिल रोजी कामगारांच्या सेवेसाठी “शिवप्रहार” संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणा निलेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.
महाराष्ट्रात कामगारांचे अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत. त्यामुळे या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कामगार संघटना सुरू करणार असल्याची घोषणा भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. येत्या १० एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ६९ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून “शिवप्रहार” कामगार संघटना काढणार असल्याची घोषणा निलेश राणेंनी केली आहे.