दीपक पाटकर यांचं दातृत्व ; शहरात ५ ठिकाणी स्वखर्चाने बेंचेस उपलब्ध

आडारी, आडवण, दांडी प्रभागात दिले बेंचेस ; नागरिकांनी मानले आभार

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी शहरातील ५ ठिकाणी स्वखर्चातून बेंचेस उपलब्ध करून दिले आहेत. आडारी सह आडवण, दांडी येथे हे बेंचेस त्यांनी दिले आहेत. स्वतःच्या प्रभागात विकास कामे अनेक जण करतात, मात्र दीपक पाटकर यांनी नागरिकांची गरज लक्षात घेऊन प्रभागा बाहेर जाऊन मदतकार्य केल्याने त्यांच्या दातृत्वाचं कौतुक होत आहे.

भाजपचे माजी नगरसेवक असलेले दीपक पाटकर हे आपल्या दातृत्वासाठी शहरात प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रभागा बरोबरच इतर प्रभागात देखील त्यांनी प्रसंगी पदरमोड करून विकास कामे केली असून स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार शहरातील तीन वेगवेगळ्या प्रभागात त्यांनी स्वतःच्या खर्चातून बेंचेस उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये आडारी सातेरी मांड येथे श्री गणेश मित्रमंडळाला एक बेंच, श्री गणेश मित्रमंडळाला राजन भोजने यांच्या घरानजीक एक बेंच, आडवण ग्रुप मित्रमंडळाला एक बेंच, दांडी श्रीकृष्णवाडी मित्रमंडळाला एक बेंच आणि बंड्या मित्रमंडळ दांडी चौकचार येथे एक बेंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मदतीबद्दल स्थानिक नागरिकांनी दीपक पाटकर यांचे आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!