आडारी गणेश मंदिर सुशोभीकरणाच्या कामाला चालना

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ : नागरिकांनी मानले आभार

कुणाल मांजरेकर

मालवण : शहरातील आडारी गणेश मंदिराच्या सुशोभीकरण आणि बैठक व्यवस्थेच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी ६ लाख ६३ हजार ५२१ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. याबद्दल येथील नागरिकांनी आ. नाईक यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेविका शीला गिरकर, सेजल परब, नितीन वाळके, अमेय देसाई, नाना गावकर, नरेश हुले, परूळेकर, राजू परब, वासू गावकर, उमेश मांजरेकर, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, यशवंत गावकर, श्री. मोर्वेकर, श्री. चव्हाण यांच्यासह आडारी मधील ग्रामस्थ आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!