“आभाळमाया” चं दमदार काम ; कट्टा येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

६५ जणांचा सहभाग ; कोरोना काळातील सलग सहावं शिबीर

कुणाल मांजरेकर

मालवण : कै. डॉ. दादासाहेब वराडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ” DLLE आणि NSS विभाग आणि “आभाळमाया” ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ६५ जणांनी रक्तदान केले. कोरोना काळातील हे सहावे शिबीर ठरले.

यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती, जि. प. सदस्य संतोष साटविलकर, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, बापू वराडकर, सचिव श्रीमती. राजश्री देसाई, संस्थेचे सचिव व आभाळमाया ग्रुपचे मार्गदर्शक सुनील नाईक, तिरवडे गावचे सरपंच विहंग गावडे, शेखर पेणकर, मालवण न्यायालयाचे सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण, सिनिअर कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी सदस्य ऍड.प्रदीप मिठबावकर, सदस्य हेमंत माळकर, ग्रामसेवक प्रकाश सरमळकर, जेष्ठ शिक्षक संजय नाईक, ग्रामपंचायत सदस्य गणेश रमेश वाईरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्हिक्टर डॉन्टस, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, मंडळ अधिकारी पेंडूर उमेश राठोड, स्मिता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या सर्वेसर्वा आणि वराडकर हायस्कुलच्या सिनिअर कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी सदस्या सौ. श्रद्धा नाईक मॅडम, पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, राज्य शुल्क विभागाचे अधिकारी जगन चव्हाण, लोकमान्य सोसायटी कट्टा शाखा व्यवस्थापक आनंद वालावलकर, अनिल चव्हाण, राजन माणगावकर, मकरंद सावंत, प्रथेमश वालावलकर, समाजसेवक विद्याधर चिंदरकर, जी. एच.फिटनेसचे मालक गौरव हिर्लेकर, पोलीस नाईक नितीन शेट्ये, उद्योजक समीर रावले, उद्योजक प्रवीण मिठबावकर, सुहास कुबल, मंदार मठकर यांनी सदिच्छा भेट दिली.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे, सदस्य रामचंद्र आंबेरकर, अमित चव्हाण, युवराज ढोलम, अवधूत डगरे, शुभम मसुरेकर, बापू चव्हाण, भाई वेंगुर्लेकर, प्राचार्य जमदाडे सर, कु. पालव मॅडम, NSS लीडर तेजस म्हाडगुत, DLLE लीडर तातराज चिंदरकर, महिला NSS लीडर कु. संजना गावडे, महिला DLLE लीडर कु.भक्ती परब, शिपाई संदेश वाईरकर, तसेच NSS आणि DLLE चे सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!