महिला दिनानिमित्त मालवणात महिलांची थायरॉईड तपासणी आणि मार्गदर्शन शिबीर

ग्लोबल रक्त वीरांगना मालवण आणि हॉटेल मालवणी कोळंब यांचे आयोजन

कुणाल मांजरेकर

मालवण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तवीरांगना मालवण आणि हॉटेल मालवणी कोळंब यांच्या वतीने तसेच ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल मालवणी सामजिक संस्था आणि ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या सौजन्याने मंगळवारी ८ मार्च रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये कोळंब येथील स्वामी समर्थ ब्लड कलेक्शन सेंटरच्या विद्यमाने सकाळी ८ ते ९ यावेळेत महिलांसाठी सवलतीच्या दरात थायरॉईड तपासणी आयोजित करण्यात आली असून सायंकाळी ६ ते ७ यावेळेत प्रख्यात आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन होणार आहे.

ग्लोबल रक्तवीरांगना मालवण, सिंधुदुर्गच्या वतीने ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या संसारिक जबाबदाऱ्या बजावित असताना स्वतःच्या आरोग्यासाठी जागरूक करणे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रक्तदानासाठी महिलांचा आकडा पुरुषांपेक्षा खूप कमी येतो, अनेकदा मनात तीव्र इच्छा असूनही कधी हिमोग्लोबिन लेव्हल कमी, ब्लडप्रेशर हाय- लो तर थायरॉईडमुळे महिला रक्तदान करू शकत नाहीत असे दिसून येते. तर कधी रक्तदानाची भीती हे कारण दिसून येते. प्रत्येक घरात जेव्हा एक स्त्री, आई, बायको, बहीण रक्तदाती असते, तेव्हा त्या घरातील प्रत्येक सदस्य रक्तदाता असतो आणि हीच काळाची गरज आहे. त्यामुळे आता रक्तदान करण्यात स्त्रीयांनी देखील पुढाकार घ्यावा, हा उद्देश घेऊन ग्लोबल रक्तदाते परिवारातील सर्व रक्तवीरांगणानी स्वपुढाकार घेऊन ८ मार्च रोजी महिला दिना दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत श्री स्वामी समर्थ ब्लड कलेक्शन कोळंब याच्या संयुक्त विद्यमाने सवलतीच्या दरात थायरॉईड टेस्ट कॅम्पचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी याचा फायदा घेऊन हा कॅम्प यशस्वी करण्यात आपले योगदान द्यावे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी सौ. माधुरी मेस्त्री नेमळेकर 8605334487/ 8624891614, सौ.नेहा कोळंबकर 9404920366, सौ. राधा केरकर 8552833784 यांच्याशी संपर्क साधावा.

महिलांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर

उपरोक्त संस्थांच्या वतीने ८ मार्च रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ग्लोबल रक्तवीरांगना मालवणच्या वतीने प्रख्यात आहारतज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. गार्गी ओरसकर यांचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी फिटनेस, डायट, हिमोग्लोबिन वाढीसाठी हेल्थ मार्गदर्शन करण्यात येणार असून लग्ना अगोदर थॅलेसेमिया मायनर टेस्टची आवश्यकता, रक्तदान जनजागृती याबाबत त्या मार्गदर्शन करणार आहेत. ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्रच्या फेसबुक पेजवरून हे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्लोबल रक्तवीरांगना मालवण, हॉटेल मालवणी कोळंब, ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल मालवणी सामजिक संस्था, ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांनी केले आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!