निलेश राणेंचे दातृत्व : कलिंगण कुटुंबाचे तिसरे शिलेदार ओंकार कलिंगण यांना मिळाले पुनरुज्जीवन
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेऊन कलिंगण कुटुंबांने मानले राणे कुटुंबाचे आभार !
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर गावचे रहिवासी कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे सर्वेसर्वा कै. बाबी कलिंगण यांचे नातू तथा युवा पिढीतील तिसरे खंदे शिलेदार ओंमकार (शांती) कलिंगण यांच्या उपचारासाठी निलेश राणे यांनी तब्बल १५ लाख रुपये खर्चून त्यांच्यावरील उपचाराचा भार उचलला आहे. या मदतीबद्दल कलिंगण कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन राणे कुटुंबियांचे आभार मानले.
नैसर्गिक आपत्ती असो वा गरजू नागरिकांवरील आर्थिक संकट, प्रत्येक वेळी माजी खासदार निलेश राणे यांच्या दातृत्वाचा वारंवार प्रत्यय आला आहे. ओमकार कलिंगण हे काही दिवस किडनी, कावीळ अशा बऱ्याच शारीरिक आजारांनी त्रस्त होते. याची माहिती मिळताच अरविंद सावंत, चंद्रशेखर राणे यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून त्यांना उपचारासाठी मुंबई मधील नामांकीत जसलोक हाॅस्पीटल मध्ये दाखल केले. त्यांच्यावर नुकतीच १५ लाख रुपये खर्चून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे ओमकार कलिंगण याना पुनरुज्जीवन मिळाले आहे. त्यामुळे कलिंगण कुटुंबियांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेऊन आभार मानले.