माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून उपलब्ध मोफत बससेवेचा शुभारंभ
कुणकेश्वर यात्रेसाठी राणेंच्या माध्यमातून मालवणातून दोन लक्झरी बस उपलब्ध
मंगळवार आणि बुधवारी भाविकांना मिळणार मोफत बससेवेचा लाभ
कुणाल मांजरेकर
मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरची यात्रेनिमित्त भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंच्या माध्यमातून मालवण शहरातून दोन खासगी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बससेवेचा शुभारंभ माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
श्री क्षेत्र कुणकेश्वरचा जत्रोत्सव महाशिवरात्री निमित्ताने होत आहे. मात्र एसटीच्या संपामुळे भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. मालवण ते कुणकेश्वर आणि कुणकेश्वर ते मालवण मार्गावर निलेश राणे यांच्या माध्यमातून मंगळवार आणि बुधवारी मोफत बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मालवण बसस्थानक नजीक या मोफत बससेवेचा शुभारंभ भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, आबा हडकर, मोहन वराडकर, भाई मांजरेकर, भाजयुमो शहर अध्यक्ष ललित चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, राजू आंबेरकर, तमास आल्मेडा यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.