उद्योगांसाठी भूखंडावर ४० टक्के बांधकामाची अट २० टक्के करू

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

कुणाल मांजरेकर 

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाशी संबंधित विविध अडचणीसंदर्भात  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मंगळवार दि. २४ ऑगस्ट रोजी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकास नियंत्रण नियमालवलीनुसार भूखंडावरील ४० टक्के बांधकाम करण्याची अट शिथिल करून २० टक्के करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली.याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे अभिनंदन करून करोनाकाळात राबविण्यात आलेल्या योजनांचे स्वागत केले. उद्योगांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध बाबींकरिता पूर्तता कराव्या लागतात. उदा. चटई  निर्देशांक, इमारत पृणत्वाचा दाखला , ट्रान्सफर मुदतवाढ व अनुदान बाबत असलेल्या अडचणींची माहिती दिली. तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे नाशिकला महिला क्लस्टरसाठी भूखंड मिळविण्याकरीता बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न करत आहे. उद्योग मंत्रालयाने महिला उद्योग धोरणानुसार नाशिकच्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरीता महिला क्लस्टरसाठी भूखंड द्यावा अशी मागणी केली. उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांनी उद्योग मंत्रालयाने सुरु केलेल्या प्रोत्साहन योजनाची (अमेन्सटी स्किम) माहिती उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र चेंबरमार्फत राज्यातील उद्योजकांपर्यंत पोहचवावी व उद्योगांना फायदा मिळवून द्यावा असे सांगितले.  शिष्टमंडळात आमदार श्री. चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पाटील, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, कागल हातकणंगले फायुस्टार मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे गोरख माळी, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सेक्रेटरी नितीन दलवाई प्रभारी सरकार्यवाह श्री. सागर नागरे उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!