“ना डरेंगे, ना दबेंगे” राणेंच्या अटकेनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे ट्विट
नारायण राणेजी की गिरफ़्तारी संवैधानिक मूल्यों का हनन : जे. पी. नड्डा
कुणाल मांजरेकर
नारायण राणेंच्या अटकेनंतर संपूर्ण भाजपा त्यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे चित्र आहे. राज्य स्तरापासून राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी राणेंची पाठराखण केली असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही ट्विट करून नारायण राणेंना पाठींबा दिला आहे. इस तरह की कार्यवाही से ना तो हम डरेंगे, ना दबेंगे असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात अटक केली आहे. या अटकेच्या विरोधात भाजप एकवटली असून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी देखील ट्विट करून राणेंना पाठिंबा दिला आहे. “महाराष्ट्र सरकार द्वारा केंद्रीयमंत्री नारायण राणे जी की गिरफ़्तारी संवैधानिक मूल्यों का हनन है। इस तरह की कार्यवाही से ना तो हम डरेंगे, ना दबेंगे। भाजपा को जन-आशीर्वाद यात्रा में मिल रहे अपार समर्थन से ये लोग परेशान है। हम लोकतांत्रिक ढंग से लड़ते रहेंगे, यात्रा जारी रहेंगी।” असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.