सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या स्टॉलचे उद्या आंगणेवाडीत उदघाटन
बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संचालक आ. नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती
मालवण : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथे बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यश मनिष दळवी यांच्या हस्ते बुधवार दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता आंगणेवाडी येथे करण्यात येणार आहे.
या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक संचालक आमदार नितेश राणे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जि. प अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा प्रबंधक नाबार्ड अजय थुटे, जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, आंगणेवाडी विकास समिती अध्यश भास्कर आंगणे, मसुरे सरपंच संदिप हडकर, देउळवाडा सरपंच आदिती मेस्त्री, उमेदचे वैभव पवार, महिला विकास आर्थिक महामंडळ समन्वय अधिकारी नितीन काळे, जि. प. सदस्या सरोज परब, पं. स. सदस्या गायत्री ठाकुर, बँक संचालक संदिप परब, व्हीक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.