वायरी भूतनाथ रेवंडकरवाडीतील आधारकार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
७५ जणांची उपस्थिती ; वायरी भूतनाथ जि. प. विभागाचे आयोजन
मालवण : भारतीय जनता पक्ष वायरी भूतनाथ जि. प. विभागाच्या वतीने वायरी भूतनाथ रेवंडकरवाडी येथील पांडया मायनाक यांच्या सुयश होम स्टे येथे आयोजित करण्यात आलेल्या नवीन आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला ७५ जणांनी उपस्थिती लावली. यातील ४५ जणांची नोंदणी पूर्ण झाली. उर्वरीतांची आधारकार्ड उद्या (शुक्रवारी) भाजपच्या मालवण तालुका कार्यालयात आयोजित शिबिरात काढली जाणार असल्याची माहिती आयोजक भाई मांजरेकर यांनी दिली आहे.
या शिबिरात प्रशांत शेटकर यांच्यासह विजय तारी पोस्टमन वायरी यांनी सहकार्य केले. यावेळी भाई मांजरेकर, मंदार लुडबे, प्रथमेश गोसावी, किमया मांजरेकर, सुयश मायनाक, बबन रेवंडकर, पांडया मायनाक, राजा नाईक, निलम मायनाक, पप्या करंगुटकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. यावेळी शिल्लक राहिलेल्या नागरिकांची आधारकार्ड १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी भाजपाच्या कोणार्क रेसिडन्सी येथील कार्यालयात आयोजित आधार कार्ड शिबिरात काढली जाणार आहेत, अशी माहिती भाई मांजरेकर यांनी दिली.