कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून ५ लाखांची मदत

कुणाल मांजरेकर

शिवसेना दशावतारी कलाकारांच्या नेहमीच पाठीशी

कुडाळ : नटश्रेष्ठ दशावतारी लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या कोकणातील लोकप्रतिनिधीनी कलिंगण यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत केली आहे. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, विधानसभेतील शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू, खासदार राहूल शेवाळे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार रमेश कोरगावकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, भाऊ कोरगावकर यांचा समावेश आहे. दशावतार कला ही कोकणची परंपरा आहे. ही परंपरा जोपासणाऱ्या दशावतारी कलाकारांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच उभी राहिल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

कै. सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुडाळ येथील बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेच्या सभागृहात आज शोकसभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ही आर्थिक मदत कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जि. प. सदस्य संजय पडते, संदेश पारकर, सिने अभिनेते दिंगबर नाईक, तहसीलदार अमोल पाठक, कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, पंचायत समिती सदस्य अंकुश जाधव, राजन नाईक, बबन बोभाटे, अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिनेश गोरे, उपाध्यक्ष समीर तेंडुलकर, देवेंद्र नाईक, राजा सामंत, अनिल हळदीवे, राजू कलिंगण, दशावतारी कलाकार उदय राणे कोनसकर, दादा कोनसकर, आनंद कोनसकर, राधाकृष्ण नाईक, दत्तप्रसाद शेणई, मारुती सावंत आदींसह सुधीर कलिंगण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!