मालवण पं. स. च्या सभापती, उपसभापतींचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
मालवण : पंचायत समितीला मिळणारा सेस फंड गेली दोन वर्षे न मिळाल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती सतीश उर्फ राजू परुळेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाला जिल्ह्यातील सर्व तालुका सभापती, उपसभापती यांनी पाठिंबा दर्शवला आहे. सेस फंड न आल्याने शेतकऱ्यांच्या योजना ठप्प झाल्या आहेत. तसेच पंचायत समिती स्टेशनरी, डिझेल व दैनंदिन कामकाज कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी हे उपोषण छेडण्यात आले आहे.