मालवणात “निलेश राणे चषक २०२२” क्रिकेट स्पर्धा ; विजेत्या संघास ३ लाखांचे बक्षीस

बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन वतीने आयोजन 

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर २३ ते २७ मार्च या कालावधीत “निलेश राणे चषक २०२२” ही राष्ट्रीय स्तरावरील खुली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती स्पर्धाप्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी दिली.

बाबा परब, मुख्य आयोजक

स्पर्धेतील विजेत्या संघास ३ लाख रुपये ‌तसेच आकर्षक निलेश राणे चषक, उपविजेता संघास १ लाख ५० हजार व आकर्षक निलेश राणे चषक, यासह वैयक्तिक स्तरावरील बक्षिसे मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टिरक्षक, अंतिम सामन्यातील सामनावीर, प्रत्येक सामना सामनावीर यांचा सन्मान तसेच क्रीडा स्पर्धेत उल्लेखनिय, कामगिरी केलेल्या खेळाडूंचा तसेच जेष्ठ खेळाडूंचे सन्मान निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी विविध समिती व समिती प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्कार समारंभ समिती प्रमुख नंदन देसाई, मैदान समिती व तांत्रिक समिती प्रमुख नितिन मांजरेकर,  व्यासपिठ समिती प्रमुख अजय शिंदे़ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!