सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एकांकिकेला पुरुष व स्त्री अभिनयातील पुरस्कार

कमल वसंत जाधव करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मिळवले यश

कुणाल मांजरेकर

मालवण : मनपा कलावंत संघटना मुंबई अंतर्गत कणकवली येथे संपन्न झालेल्या श्रीमती कमल वसंत जाधव करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या “ठसका” एकांकिकेला पुरुष व स्त्री अभिनयातील पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या एकांकिकेमध्ये महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुरुष कलाकारामधे सुशांत पवार यांना तर स्त्री कलाकार म्हणून सौ. शुभदा टिकम यांना उत्कृष्ट अभिनय पुरस्काराने गौरविण्यात आले. या एकांकिकेमध्ये देवेन कोळंबकर, सचिन टिकम, शुभदा टिकम, सुशांत पवार, अभय कदम, जान्हवी बिरमोळे, प्रथमेश सामंत, मिताली नेरकर, सौम्या कुरले, लक्ष्मी नेरकर, एकनाथ तोडणकर, सर्वेश परुळेकर, ओम मालवणकर, अद्वैत टिकम आदी कलाकारांनी सहभाग घेतला होता. या एकांकिकेचे दिग्दर्शन प्रशांत केणी, नेपथ्य देवेन कोळंबकर व सर्वेश परूळेकर यांनी केले. तर पार्श्वसंगीत रोहित कुडे व सर्वेश परुळेकर यांनी दिले. ही एकांकिका चैतन्य देशपांडे यांनी लिहिली आहे. यावेळी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. हंबीरराव चौगले, सहायक प्रा. प्रमोद खरात तसेच किरण करवडकर, पंकज कवटकर, प्रवीण नडगेरी आदी विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत, सर्व प्राध्यापक, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे, साईनाथ चव्हाण यांनी सर्व विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!