वार्ड ९ व १० मध्ये आयोजित ई श्रम कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सौ. स्नेहा आचरेकर, दीपक पाटकर यांच्या वतीने भाजपा कार्यालयात आयोजन
मालवण : केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड योजना सुरू केली आहे. यात कल्याणकारी योजनांचा लाभ, रोजगाराच्या अनेक संधी तसेच दोन लाखांचा मोफत विमा असणार आहे. या योजनांसाठी नागरिकांची ई श्रम कार्ड नोंदणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मालवण भाजप कार्यालयात प्रभाग ९ व १० येथील नागरिकांसाठी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेविका स्नेहा आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या वतीने मोफत स्वरूपात ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले. या शिबिराला सकाळ पासूनच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
यावेळी आचरेकर, पाटकर यांच्यासह भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, आबा हडकर, निकीत वराडकर, पंकज गावडे यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. शिबीर कार्ड नोंदणीसाठी कृष्णा साळसकर, नम्रता साळसकर, कृपा मयेकर, अक्षता गोसावी, प्रियांका कासले, भाग्यश्री शिंदे आदींचे सहकार्य लाभले, अशी माहिती ललित चव्हाण यांनी दिली. यापूर्वीही मालवण भाजपच्या वतीने कार्यालय तसेच शहरातील विविध प्रभागात ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करून नागरिकांना कार्ड वितरित करण्यात आले आहेत.