रस्ता डांबरीकरणात फक्त दगड ; डांबराचा थांगपत्ताच नाही !

बांदिवडेत ग्रामस्थांनी रोखले काम ; पुन्हा डांबरीकरण करून देण्याची सा. बां. अधिकाऱ्यांची ग्वाही

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण तालुक्यातील बांदिवडे ग्रामस्थांनी रस्त्याच्या बोगस कामाचा पर्दाफाश केला आहे. येथील रस्त्याच्या डांबरीकरणात डांबराचा थांगपत्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी उघड करीत रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे काम रोखून धरल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला याबाबत कळविल्या नंतर शाखा अभियंता श्री. दाने यांनी बांदिवडे येथे येत सदर काम पुन्हा करून देण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली.

बांदिवडे बाजार ते पालयेवाडी या मार्गावर रस्त्याचे डांबरीकरण चालू आहे. डांबरीकरण करताना योग्य दर्जाची व आकाराची खडी न वापरणे, काही ठिकाणी डांबरच वापरले नसल्या बाबत माजी पंचायत समिती सदस्य प्रफुल्ल प्रभू, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मयेकर यांनी बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दाने यांचे यावेळी लक्ष वेधले. उपस्थित ग्रामस्थानी सुद्धा काम दर्जेदार नसल्याबाबत आपले म्हणणे मांडले. शाखा अभियंता दाने यांनी सदर डांबरीकरण करण्यासाठी पसरलेली खडी काढून वर्क ऑर्डर प्रमाणे काम करून घेतले जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. पुन्हा बोगस काम करण्याचा प्रयत्न झाल्यास होणाऱ्या परिणामाना शासन जबाबदार असेल असे यावेळी प्रमोद मयेकर यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच किरण पवार, भाजप नेते प्रफुल्ल प्रभू, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मयेकर, आनंद परब, मधुकर परब, आशु मयेकर, आपा परब, विश्वनाथ परब, बाळा माळकर, बबलू मिठबावकर, लीलाधर मुणगेकर, बबन मांजरेकर, शाहू लखन बांदिवडेकर, गणेश बांदिवडेकर, निशु मुणगेकर, उमेश परब, संतोष मयेकर आदी बांदिवडे मळावाडी, पालयेवाडी खोरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!