खा. सुरेश प्रभूंच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनीना सायकल वाटप

असरोंडी हायस्कूलमध्ये उपक्रम : १० विद्यार्थिनींना लाभ : महेंद्र चव्हाण यांचा पाठपुरावा

मालवण : भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून असरोंडी हायस्कूल येथे जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून १० विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

यावेळी मानव विकास परिवर्तन केंद्राचे जिल्हा समन्वयक विलास हडकर, प्रशालेचे सचिव सावंत सर, उपसरपंच मकरंद राणे, मुख्याध्यापक पाटील सर, ग्रा. पं. सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच मकरंद राणे यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी खा. प्रभू यांच्यासह विलास हडकर, विजय केनवडेकर यांचे आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!