मेढा जय गणेश मंदिरात आयोजित ई श्रम कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपचे माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेविका ममता वराडकर यांचे आयोजन

मालवण : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश कुशे आणि माजी नगरसेविका सौ. ममता वराडकर यांच्या संयुक्त विद्यमाने मेढा येथील जय गणेश मंदिरात आयोजित ई श्रम कार्ड नोंदणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर सुरू राहणार आहे. मेढा भागातील नागरिकांनी या शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड योजना सुरू केली आहे. यात कल्याणकारी योजनांचा लाभ, रोजगाराच्या अनेक संधी तसेच लाखांचा मोफत विमा असणार आहे. यासाठी नागरिकांची ई श्रम कार्ड नोंदणी केली जात आहे. तरी या शिबिराला नागरिकांनी उस्फुर्त रित्या प्रतिसाद दिला जात आहे, या शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक गणेश कुशे व माजी नगरसेविका सौ. ममता वराडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिराला माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक आपा लुडबे, विजय केनवडेकर यांच्यासह भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!