मालवणमध्येही खुलं झालं स्वस्त आटाचक्की आणि वॉटर प्युरीफायरचं दालन !

भाजप नेते निलेश राणेंचा उपक्रम ; दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

२१ फेब्रुवारी पर्यंत मामा वरेरकर नाट्यगृहासमोर ५० % सवलतीच्या दरात मिळणार वस्तू

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवणात स्वस्त दरातील आटाचक्की आणि वॉटर प्युरीफायरचं दालन खुलं झालं आहे. येथील मामा वरेरकर नाट्यगृहासमोर खुल्या झालेल्या या दालनात ५० % सवलतीच्या दरात या वस्तू उपलब्ध होणार आहेत. भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी याठिकाणी खरेदीसाठी गर्दी केली होती.

माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सवलतीच्या दरात सवलतीच्या दरात आटा चक्की व वॉटर फिल्टर वितरण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे कुडाळ नंतर मालवण मध्येही जनतेच्या आग्रहास्तव ११ ते २१ फेब्रुवारी रोजी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहासमोर ५०% सवलतीच्या दरात नागरिकांना आटाचक्की आणि वॉटर फिल्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून कुडाळ मध्ये ५०% सवलतीच्या दरात आटा चक्की आणि वॉटर फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जनतेच्या आग्रहास्तव मालवण मध्ये देखील हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २१ फेब्रुवारी पर्यंत शहरातील मामा वरेरकर नाट्यगृहासमोर नागरिकांना या वस्तू उपलब्ध होणार आहेत.

यामध्ये १२ लिटर क्षमतेचा वॉटर फिल्टर ११,९९९ चा ४,४९९ रुपये, १५ लिटर क्षमतेचा वॉटर फिल्टर १३,९९९ चा ४,९९९ रुपये, सर्व प्रकारच्या धान्यासाठी उपयुक्त १६,९९९ रुपयांची आटाचक्की ७,४९९ रुपये, सर्व प्रकारचे धान्य, खारीक, खोबरे, मिरची मसाले यांसाठी उपयुक्त आटाचक्की १९,९९९ ऐवजी ९,६९९ रुपयांना मिळणार आहे. या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड आणि रेशनकार्डची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ भाजप नेते दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विलास हडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, आयोजक गणेश कुशे, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, भाऊ सामंत, भाजयुमो शहर अध्यक्ष ललित चव्हाण, विलास मुणगेकर, राजू बिडये, प्रमोद करलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, महेश मांजरेकर यांच्यासह भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!