कट्टा येथे महिला मेळाव्यातून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन ; आ. वैभव नाईकांच्या हस्ते शुभारंभ

महिलांनी कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी सोडू नये : आ. नाईक

कुणाल मांजरेकर

मालवण : शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मालवण तालुक्यातील कट्टा येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यापूर्वी माणगाव मध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या पाठोपाठ कट्टा येथील मेळाव्याला पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यामध्ये महिलांसाठी पैठणी स्पर्धा घेण्यात आली. तसेच हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला आ. वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेच्या प्रयत्नांतून जिल्ह्यात सुरू होत असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी यावर्षीपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी आता एम.बी.बी.एस होणार आहेत. परिणामी जिल्ह्यात चांगले डॉकटर उपलब्ध होतील. महिलांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी शिवसेना काम करत असून सिंधुरत्न योजनेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी सोडू नये. त्यासाठी शिवसेना सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, महिला उपजिल्हासंघटक देवयानी मसुरकर, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, सौ. लाड, लता खोत, सुगंधा गावडे, विष्णू लाड, डॉ. गोपाळ सावंत, सोमनाथ माळकर, दादा वायंगणकर, निलेश हडकर, बाबू कांबळी, यशवंत भोजने, आकेरकर सर, सौ. नागवेकर, शांती नाईक, शाखाप्रमुख देवानंद रेवडेकर, जगदीश ओरोसकर आदींसह कट्टा पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!