भाजपात आ. नितेश राणेंची “क्रेझ” वाढली ; म्हापसा येथील मोदींच्या सभेत “खास” सन्मान
गोवा : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या आरोपांखाली कारागृहात असलेल्या आमदार नितेश राणेंनी दुपारी सावंतवाडी कारागृहातून जामीनावर सुटका झाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हापसा-गोवा येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहीलेल्या आ. नितेश राणे यांचा या सभेत खास सन्मान करण्यात आला आहे. याठिकाणी आ. नितेश राणे दाखल होताच उपस्थितांची त्यांच्या सोबत फोटो घेण्यात चढाओढ पाहायला मिळाली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर राणेंना पहिल्या रांगेत स्थान देऊन भाजपाचा राणेंवरील विश्वास कायम असल्याचे दाखवून दिले.
कारागृहातून सुटका झाल्यानंतर आमदार नितेश राणे आपल्या सहकाऱ्यां समवेत मागच्या रांगेत बसले होते. परंतू व्यासपीठावर असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. नितेश राणे यांना पाहताच तेथूनच स्थानिक कार्यकर्त्यांना आ. राणेंना पहील्या रांगेत बसवायला सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आदी उपस्थित होते.