दोडामार्गात भाजपचं बळ वाढलं ; अपक्ष नगरसेवक भाजपात

दोडामार्ग : नुकत्याच झालेल्या दोडामार्ग नगरपंचायत च्या सार्वत्रिक निवडणूकीत एकहाती वर्चस्व मिळवणाऱ्या भाजपचे नगरपंचायती मधील बळ वाढले आहे. येथील अपक्ष नगरसेविका संध्या प्रसादी यांनी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला.

दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवून स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना जोरदार धक्का दिला आहे. स्थानिक आमदार असून देखील येथे शिवसेनेला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या यापूर्वी १३ होती. आता त्यामध्ये एकाची भर पडली असून आता येथील नगरपंचायती मध्ये भाजप नगरसेवकांची संख्या १४ झाली आहे. तर याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक-एक नगरसेवक आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, माजी जिल्हापरिषद सभापती एकनाथ नाडकर्णी, अमित प्रसादी आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!