शिवसेनेमार्फत देवली व मालोंड बेलाचीवाडी येथे विकास कामांचा धडाका

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विविध कामांची भूमिपूजने

ठेकेदारांनी दर्जेदार कामे करावीत ; आ. वैभव नाईक यांची सूचना

मालवण : मालवण तालुक्यातील देवली गावात मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज पार पडला. गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. कुडाळ मालवण तालुक्यात अनेक विकास कामे मंजूर केली असून प्रत्यक्षात कामे सुरु झाली आहेत. उर्वरित कामे येत्या काळात मार्गी लावली जाणार आहेत. लोकांच्या तक्रारी येता नये यासाठी ठेकेदारांनी देखील दर्जेदार कामे करावीत, असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले आहे.

यामध्ये देवली ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण, देवली स्मशानभूमी ते पिरकुली जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, भगवती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे निधी ५ लाख, देवली वाघवणे ग्रा.मा. ४११ खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख,खालची देवली भगवती मंदिर खाणेतरवाडी रस्ता ग्रा. मा. ४२१ संरक्षण भिंत बांधणे निधी ५ लाख, प्रमुख राज्य मार्ग ०४ पासून देवली चिंचेचा वहाळ बंडावाडा ते बावखोल मार्ग ग्रा.मा. ४१५ डाबंरीकरण करणे निधी १० लाख, देवली बोवलेकर वाडी नळ योजना विस्तारीकरण करणे १ लाख, देवली वाघवणे येथील सातेरी मंदिराजवळ स्मशानशेड बांधणे निधी ३ लाख, गोवेकर मांगर ते गावराखा रस्ता डांबरीकरण करणे निधी ५ लाख त्याचबरोबर श्री. देव नारायण मंदिर मालोंड बेलाचीवाडी ते भटवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख या कामांची भूमिपूजने झाली.

याप्रसंगी देवली येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच गायत्री चव्हाण, उपसरपंच भाऊ चव्हाण, शाखाप्रमुख सचिन मालवणकर, शामा वाघकर, रामू चव्हाण, बबलू चव्हाण, शिवदास चव्हाण, शामा मेस्त्री, विजय चव्हाण, सुरेश नाईक, संतोष आचरेकर, गणेश मयेकर, भूषण बोवलेकर, पप्पू पेडणेकर, बाळा कोळंबकर. मालोंड बेलाचीवाडी येथे पंकज वर्दम, श्रीकृष्णा पाटकर, सुभाष धुरी, विजय पालव, नाना नेरूरकर, सरपंच वैशाली घाडीगावकर, उपसरपंच नाना परब, मोहन घाडीगावकर, दिपिका मेस्त्री, प्रेरणा पुजारे, गोंविद परब, सुहास सुर्वे, भाई तांडेल, बाबा घाडीगावकर, रविकांत घाडीगावकर, दिनेश परब व बेलाचीवाडीतील ग्रामस्थ, शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!