Burning Bus : चालती बस पेटली ; ३७ प्रवासी सुदैवाने बचावले

वैभववाडीतील एडगाव घाडीवाडी नजीक दुर्घटना

वैभववाडी : पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या मनीष ट्रॅव्हल्सच्या बसने अचानक पेट घेतल्याने ही जळून खाक झाली आहे. ही दुर्घटना आज पहाटे ४ वा. एडगांव घाडीवाडी नजीक घडली आहे. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या बसमधील ३७ प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. तर एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

मनीष ट्रॅव्हल्सची (जीए ०३/डब्लू २५१८) ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली असता बसने अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवली. दरम्यान बसमधील प्रवासी खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ येऊ लागले. व बसने मोठा पेट घेतला. या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात धडकताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांची विचारपूस केली. दरम्यान महामार्ग विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही तासात कुडाळ येथील अग्निशमन बंब दाखल झाला. व आग विझवण्यात आली. या घटनेनंतर एडगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजता अडकलेली वाहने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!