“अप्पर जिल्हाधिकारी हटाव, पर्यावरण बचाव” ; मनसेच्या मोर्चाने मुख्यालय दणाणले 

ओरोस : “अप्पर जिल्हाधिकारी हटाव, पर्यावरण बचाव”, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो”, “राजसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “जीजी उपरकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा गगनभेदी घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्यातील अवैध मायनिंग तसेच सिलिका प्रकल्प, अफाट वृक्षतोड आदी पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प व या सर्वांना पाठीशी घालणारे जबाबदार भ्रष्ट अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी होवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, यांसह विविध मागण्यांकडे यावेळी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देताना माजी आमदार परशुराम उपरकर सोबत मनसेचे अन्य पदाधिकारी 

सिंधुदुर्गनगरी सिडको कार्यालय परिसर ते जिल्हाधिकरी कार्यालय प्रवेशद्वार असा हा मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाच्या कार्यपध्ती विरोधातजोरदार घोषणाबाजी करीत यावेळी मुख्यालय परीसर दणाणून सोडण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येताच पोलिसांनी अडवून शिष्टमंडळाला निवेदन देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले. अलीकडील काळात उद्भवलेली महापूर सदृश्य परिस्थिती त्यात झालेली वित्त व जीवित हानी,भूस्खलनमुळे ओढवलेली आपत्ती, कळणे मायनिंग परिसरात गावावर ओढवलेली आपत्ती तसेच जमीन महसूली निवाड्यामधील जनतेच्या तक्रारी, याला तत्कालीन खनिकर्म अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. शिवाय करोडो रुपयांचा महसूल बुडीत करून वैयक्तिक हितसंबंध जोपासत शासनाचे नुकसान करणे असेही प्रकार महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून घडत आहेत. पर्यावरणाने सुख समृद्ध असलेल्या जिल्ह्यात मायनिंग लॉबीला पाठीशी घालणाऱ्या नतभ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तावडीतून जिल्ह्याची सुटका होणे काळाची गरज आहे. मात्र याबाबत राज्यातील सत्ताधारी  जागरूक नसून दुर्लक्ष करत असल्याने अधिकऱ्यांकडून मनमानी करत स्थानिक ग्रामस्थानांचा विरोध दडपला जातो. मायनिंग माफियांच्या विरोधात जनतेच्या तीव्र भावना प्रशासनाकडे मांडण्यासाठी आणि महसुलच्या या बड्या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीच्या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरली असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यानी सांगितले.

ओरोस मधील मोर्चा समोर बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांसह भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली 

यावेळी वाढती महागाई, पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. या मोर्चा मध्ये माजी आमदार परशुराम उपरकर , कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सचिव राजेश टंगसाळी, दया मेस्त्री, संतोष सावंत, अमोल जंगले, विनोद सांडव, सचिन तावडे, शैलेश अंधारी, दत्ताराम बिडवाडकर, चंदन मेस्त्री, कुणाल किंनळेकर, बाळा पावसकर, सुनील गवस दत्ताराम गावकर, आशिष सुभेदार, बाबल गावडे, दीपक गावडे, आप्पा मांजरेकर आदीसह मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

साडेतीन वर्षे हे अधिकारी कार्यरत असून यांच्या काळात इको सेन्सिटिव्ह झोन आणि आणि खाणींना मोठ्या प्रमाणात परवानग्या देण्यात आल्या. मात्र एकाही ठिकाणी त्यांनी काम व्यवस्थित सुरू आहे का, याची पाहणी केली नाही. परिणामी २००८-०९ मध्ये सातार्डयामध्ये भूस्खलन झाले. तर यंदा २९ जुलै रोजी कळणे मध्ये भूस्खलन होऊन लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपर जिल्हाधिकारी यांच्या काळात डंपर आणि मायनिंगवर झालेल्या कारवाईत यांच्याकडील अपिलाच्या सुनावणीत संबंधितांना मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली. जमिनींच्या निवाड्या मध्येही आर्थिक व्यवहार करून गोरगरिबांची फसवणूक करण्यात आली असून  अशा अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे .

परशुराम उपरकर, माजी आमदार 

मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तो क्षण 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!