भाजप शिष्टमंडळ आक्रमक होताच प्रशासन नरमले ; चार दिवसात “त्यांच्या” खात्यात होणार नुकसान भरपाई जमा

सावंतवाडी (प्रतिनिधी)
सावंतवाडी तालुक्यात २३ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला महापूर आला होता. त्यामुळे तालुक्यातील माडखोल ते इन्सुलीपर्यंत शेतकऱ्यांची घरे, शेती, बागायती, गोठे  यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून करण्यात येऊन त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठविला असतानाही एक महिन्या नंतरही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई प्राप्त झालेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी आक्रमक होत नायब तहसीलदार मनोज मुसळे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.

संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी नुकसान भरपाई अदा करण्यात यावी अन्यथा गणेशोत्सवात जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली आहे.  चार दिवसांत पूरग्रस्तांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा होईल, असे आश्वासन नायब तहसिलदार मनोज मुसळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.  यावेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते तसा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा बांदा मंडल तालुका अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, पंचायत समितीच्या माजी सभापती मानसी धुरी, भाजपचे बांदा मंडल तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, इन्सुलीचे माजी सरपंच नंदू पालव, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, प्रवीण देसाई, मधुकर देसाई, अमेश कोठावळे, औदुंबर पालव आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!