शिवसेनेकडून मालवण तालुक्यात विकास कामांचा धडाका ; आ. वैभव नाईकांची उपस्थिती
तळगाव, वायरी, कुंभारमाठ येथील विविध विकासकामांची भूमिपूजने
कुणाल मांजरेकर
मालवण : तळगाव, वायरी, कुंभारमाठ येथील विविध विकास कामांची भूमिपूजने आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये तळगाव देवारेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, तळगाव व्यायाम शाळा पायाभरणी, तळगाव खांदवाडी संरक्षण भिंत बांधणे, तळगाव देऊळवाडी नाल्यावर साकव बांधणे, तळगाव शेळवणेवाडी बोभाटे घर येथे साकव बांधणे, त्याचबरोबर वायरी भूतनाथ स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, मालवण मुख्य रस्ता ते सर्वोदय कॉलनी जाणारा रस्ता या कामांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तळगाव येथे सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण, माजी उपसपंच प्रसाद दळवी, माजी सरपंच आपा देसाई, शाखाप्रमुख संतोष पेडणेकर, शिशुपाल राणे, जयवंत बोभाटे,जयेश बोभाटे, सुरेश दळवी कुंभारमाठ येथे आनंद सावळे, पी. जी. पाटील, कमलाकर पाताडे, महेंद्र पाताडे, सुरेंद्र परब, आनंद पाटकर, अनिल मोर्जे, भालचंद्र पाटील, पूनम सावळे, यशवंत कोयंडे, जमशेठ खान, वायरी येथे प्रसाद आडवणकर, भगवान लुडबे, मनोज लुडबे, संदेश तळगावकर, शामा झाड, मिलिंद झाड, गोट्या मसुरकर, बाबल गोसावी, नाना नाईक, दीपा देसाई, कृष्णा देऊलकर, प्रदीप वेंगुर्लेकर, अभय पाटकर आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.