मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ऑनलाईन निबंध स्पर्धा

मालवण : मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचे भूगोल विषयाचे अध्यापक, लेखक, एकांकिकाकार, नाटककार, नाट्यकलाकार, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातही ठसा उमटविलेले असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कै. लीलाधर चव्हाण यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त २२ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय शालेय, माध्यमिक, महाविद्यालयीन व खुला अशा ४ गटांमध्ये ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

गट १ ला – इयत्ता १ ली ते ४ थी, शब्द मर्यादा १०० ते १५०. विषय १) माझी शाळा, २) माझा आवडता प्राणी. प्र. क्र. रोख रक्कम रु.५०० व प्रमाणपत्र, द्वि. क्र. रोख रक्कम रु. ३०० व प्रमाणपत्र, तृ. क्र. रोख रक्कम रु. २०० व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ क्र. रोख रक्कम रु. १०० व प्रमाणपत्र.

गट २ रा – इयत्ता ५ वी ते १० वी शब्द मर्यादा  ३५० ते ४००. विषय- १) ऑनलाईन शिक्षण फायदे व तोटे २) भारतीय स्वातंत्र्याचा अमृताहोत्सव. प्र. क्र. रोख रक्कम रु. ७०० व प्रमाणपत्र, द्वि. क्र. रोख रक्कम रु. ५०० व प्रमाणपत्र, तृ. क्र. रोख रक्कम रु. ३०० व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ क्र. रोख रक्कम रु. २०० व प्रमाणपत्र.

गट ३ रा – इयत्ता ११ वी ते १५ वी शब्द मर्यादा – ५०० ते ७५०. विषय १) शिक्षण ऑफलाईन की ऑनलाईन २) अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यांनी आम्हांस काय दिले? प्र. क्र. रोख रक्कम रु. १,००० व प्रमाणपत्र, द्वि. क्र. रोख रक्कम रु. ७०० व प्रमाणपत्र, तृ. क्र. रोख रक्कम रु. ५०० व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ क्र. रोख रक्कम रु. ३०० व प्रमाणपत्र.

खुला गट – शब्द मर्यादा – १०००. विषय – १) ऑनलाईन शिक्षणाचे येत्या पिढीवर होणारे दिर्घकालीन परिणाम, २) अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यांची बेरीज व वजाबाकी. प्र. क्र. रोख रक्कम रु. १,५०० व प्रमाणपत्र, द्वि. क्र. रोख रक्कम रु. १,००० व प्रमाणपत्र, तृ. क्र. रोख रक्कम रु. ७०० व प्रमाणपत्र, ४) उत्तेजनार्थ क्र. रोख रक्कम रु. ५०० व प्रमाणपत्र.

स्पर्धेचे नियम व अटी : १) सदर स्पर्धा मालवण तालुकास्तरीय शालेय माध्यमिक, महाविद्यालयीन व खुला गटाकरीता मर्यादित असेल. २) स्पर्धक मालवण तालुक्यातील शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणारे असावेत तसेच खुल्या गटातील स्पर्धक मालवण तालुक्याचा रहिवाशी असावा. ३) स्पर्धकाने दोन विषयापैकी एका विषयाची निवड करुन निबंध लिहावयाचा आहे. निबंध लिहिलेल्या कागदावर आपले नाव किंवा अन्य खुणा, माहिती असता कामा नये. आपले नाव संपूर्ण पत्ता, शाळेचे नाव, इयत्ता, स्पर्धेचा गट क्रमांक स्वतंत्र कागदावर लिहून निबंधासोबत पाठवावयाचा आहे. ४) निबंध केवळ मराठी भाषेतूनच लिहिण्यात यावा. निबंध एकापेक्षा जास्त पानांचा असल्यास पान क्रमांक नमूद करावेत.५) निबंध कागदावर सुहस्ताक्षरात पेनाने लिहून त्याचा सुस्पष्ट फोटो व्हॉटस् अॅप नंबर ९४०३५५७३५६  यावर शनिवार दि. १२ फेब्रुवारी २०२२  पर्यंत पाठवावेत. ६) स्पर्धकांची निवड लिहिलेल्या निबंधातील विषयाची मांडणी, भाषाशैली, शुद्ध लेखन वगैरे बाबींचा विचार करुन गुण देण्यात येतील. ७) आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.

या ऑनलाईन निबंध स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!