चिंदर येथील रामेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी देवेंद्र हडकर
उपाध्यक्ष पदी सुनील पवार यांची निवड ; दोन्ही निवडी बिनविरोध
नूतन पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा : धोंडू चिंदरकर
कुणाल मांजरेकर
मालवण: चिंदर येथील रामेश्वर विविध. सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सिताराम उर्फ देवेंद्र हडकर तर उपाध्यक्षपदी सुनिल मनोहर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले.
सोसायटीच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष देवेंद्र हडकर यांनी देऊन शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून जिल्हा बँकेच्या सहकार्याने गावातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ व्हावा यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षपदी संधी दिल्या बद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, संतोष कोदे, संतोष गांवकर व सर्वसामान्य शेतकरी वर्गाचे त्यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर म्हणाले, आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सोसायटी अध्यक्षपदा पासूनच झाली. आपण प्रामाणिकपणे काम केलेल्याची पोचपावती म्हणून विविध पदे उपभोगत मी आज भाजप तालुकाध्यक्षाच्या रुपात दिसत आहे. सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा व हेच आपले मुख्य ध्येय ठेवावे, असे ते म्हणाले. यावेळी सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष कोदे, महेंद्र मांजरेकर, संतोष गांवकर, दिगंबर जाधव, रवी घागरे, मनोज हडकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, संजय माळकर, प्रकाश मेस्त्री, दत्ता वराडकर, सतिश हडकर, संजय लोके, आनंद पवार, विश्राम हडकर, संजय लोके, आनंद पवार, विश्राम गोसावी, रोशन गोसावी, सुरेश साटम, परेश चव्हाण, बाळा लब्दे, रश्मी पाताडे, कवी माळगांवकर, दादा हडकर आदी उपस्थित होते.