जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना कोरोनाची लागण

ओरोस : सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांचा रॅपिड टेस्ट मध्ये कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला होम आयसोलेशन करून घेत वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी गेली दोन वर्षे कोरोना नियंत्रणासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवताच त्यांनी रॅपीड टेस्ट करून घेतली. यामध्ये त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोनाची गंभीर लक्षणे दिसत नसली किंवा मोठा धोका नसला तरी संसर्ग वेगाने वाढत आहे त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी, कोविडचे नियम पाळावेत असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!