कै. सुधीर चव्हाण कुटुंबियांचे ना. नारायण राणेंनी केलं सांत्वन
मालवण : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १६ मधील भाजपाचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी सायंकाळी सुधीर चव्हाण यांच्या आडवण येथील मूळ निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, मोहन वराडकर, पूजा करलकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, मंदार लुडबे, अभय कदम, प्रमोद करलकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी देखील दुपारी कै. सुधीर चव्हाण यांच्या आडवण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.