बाबा परब, मेघनाद धुरींचे जिल्हा बँक कर्मचाऱ्यांकडून स्वागत !
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मालवण तालुक्यातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक संदीप उर्फ बाबा परब आणि मेघनाद धुरी यांचे शनिवारी जिल्हा बँकेच्या मालवण कार्यालयात कर्मचाऱ्यांनी स्वागत करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
जिल्हा बँकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मालवण तालुक्यातून व्हिक्टर डॉन्टस, संदीप उर्फ बाबा परब आणि मेघनाद धुरी यांनी विजय मिळविला आहे. यापैकी बाबा परब आणि मेघनाद धुरी या संचालकांनी शनिवारी जिल्हा बँकेच्या मालवण येथील कार्यालयाला भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी देवानंद लोकेगावकर, विश्वनाथ डोर्लेकर, संदीप मर्गज, सोमा सकपाळ, महेश वालावलकर, केशव आचरेकर, सुरेश वरक, संजय वीर आदी कर्मचारी उपस्थित होते.