जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी यांचे मालवणात जल्लोषात स्वागत !

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलमधून विजयी झालेल्या मेघनाद धुरी यांचे मालवणात आगमन झाल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एसटी स्टॅन्ड नजीक त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी बँकेचे विद्यमान संचालक तथा भाजपाचे उमेदवार गुलाबराव चव्हाण यांना विक्रमी मताधिक्‍याने पराभूत केले आहे. या निकालानंतर मेघनाद धुरी यांचे मालवणमध्ये आगमन झाल्यानंतर मालवण बस स्टँड नजीक त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी अरविंद मोंडकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, युवक जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, शहर युवक अध्यक्ष गणेश पाडगावकर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, सरदार ताजर, हेमंत कांदळगावकर, सौ. शुभदा पाडगावकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!