वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सावंतवाडीत बालकानी केले रक्षाबंधन
सावंतवाडी (प्रतिनिधी)
सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील जि. प. शाळा नं. 2 मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या तीन वर्षीय बालकांनी रविवारी अनोखा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला या बालकांनी झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाचाऱ्हास झाल्यामुळे वादळ, पाऊस, वारा, अतिवृष्टी, महापूर येऊन जनजीवन विस्कळीत होत आहे. यासाठी झाडे लावा, झाडांचे संवर्धन करा, त्यांचे रक्षण करा, त्यांना भाऊ बनवा असा संदेश या बालकांनी या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमांमधून दिला. गरिमा सावंत, ईशानी केसरकर, तनिष मेस्त्री, सुखम् करमरकर, श्रेयस केसरकर यांनी झाडाला राखी बांधली. यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस आमिशा सासोलकर पालक प्रांजल मेस्त्री, निर्जरा सावंत, पूजा केसरकर, विनिता करमरकर आदी उपस्थित होते. यावेळी या बालकांनी शाळेच्या आवारातील झाडाच्या बुंध्याला राख्या बांधून रक्षाबंधन केले