अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या जिल्हा संघटकपदी आगोस्तीन डिसोझा
मालवण : महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी आगोस्तीन उर्फ मधलो डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन वर्षांच्या काळासाठी श्री. डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून ख्रिस्ती विकास परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी भरीव कार्य करावे आणि संपुर्ण ख्रिस्ती समाजाची मदत करावी अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी व्यक्त केली आहे.