सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट संघाचे १६ वर्षांखालील निवड चाचणी सत्र संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रविवारी जिल्हा क्रिकेट संघाचे १६ वर्षांखालील निवड चाचणी सत्र घेण्यात आले. या निवड सत्रामध्ये जिल्ह्यातील एकूण ६५ क्रिकेटपटूनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४० क्रिकेटपटुंची प्रथम फेरीत निवड करण्यात आली.
     सदर निवड चाचणी सत्राचा शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक राजन आंगणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी सभापती तथा नगरसेवक ॲड. परिमल नाईक, असोसिएशन पदाधिकारी ॲड. राजन नाईक यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून सर्व सहभागी क्रीडापटूना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक उदय नाईक, बाळ चोडणकर, रघु धारणकर,बाळा मडगांवकर,बाबल्या दुभाषी, राहुल रेगे, राजू डोंगरे,सी. ए नाईक, महेश भाट आदी असोसिएशनचे पदाधिकारी व पालक उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी एम्स अकॅडेमी सावंतवाडी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!