नाधवडे येथील गोविंद उर्फ बाळातात्या कुडतरकर यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) नाधवडे गावचे गावप्रमुख ग्राम विकास मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष आणि नवजीवन शिक्षण संस्थेचे विश्वस्त गोविंद कृष्णाजी उर्फ बाळातात्या  कुडतरकर  (वय 77) यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
गोविंद कुडतरकर हे गावात बाळा या टोपण नावाने परिचित होते. त्यांना तात्या या आदरार्थी नावाने देखील संबोधित असत. मुंबईमध्ये माध्यमिक विद्यालयात लिपिक पदावर त्यांनी सेवा केली होती.  अत्यंत संयमी असणारे बाळातात्या नाधवडे गावातील कठिण विषयही सहजरित्या हाताळत असत. एक महिन्यापासून त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते. परंतु त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नाधवडे गावावर शोककळा पसरली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!