पहिल्याच दिवशी प्रशालेत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

वैभववाडी : कोरोना महामारीमुळे अनेक महीने बंद असलेल्या शाळांची घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी रामेश्वर विद्या मंदिर एडगांव नं. १ प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मोठ्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण रावराणे, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष प्रताप रावराणे, ग्रामसेवक उमेश राठोड, मुख्याध्यापक चेतन बोडेकर, अजित गुरव, अंगणवाडी सेविका नेहा पवार, मदतनीस रुच्या पवार व समिती सदस्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!