मालवण शहरात विकास कामांना वेग ; ६० लाखांच्या कामांची भूमिपूजने
आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण शहरात नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामांना वेग आला आहे. गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सुमारे ६० लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची भूमिपूजन करण्यात आली. येत्या वर्षभरात ही कामे पूर्णत्वास जाणार आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.
यामध्ये भरड भाट येथील चिपकर घर रस्ता डांबरीकरण व गटार बांधकाम ६,२३,२९९ रुपये, बसस्थानक ते दलीतवस्ती रस्ता रुंदीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे व डांबरीकरण १५,८१,३५९ रुपये, मालवण बसस्थानक समोरील दलीतवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण १३,९१,९४६ रुपये, हॉटेल महाराजा ते दलीतवस्ती रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण भूमिपूजन २३,७६,९९६ रुपये आदी कामांचा समावेश आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास आमदार वैभव नाईक यांच्यासह उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला संघटक पूनम चव्हाण, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, नगरसेवक आप्पा लुडबे, नगरसेविका पुजा करलकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, अंजना सामंत, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सचिव महेश उर्फ बाळू अंधारी, जेम्स फर्नांडिस, उमेश मांजरेकर, किसन मांजरेकर, बाळू नाटेकर, प्रसाद आडवणकर, अमेय देसाई, आबा खोत, समीर हडकर, सन्मेश परब, यशवंत गावकर, सिद्धेश मांजरेकर, पालिकेच्या बांधकाम अभियंता सोनाली हळदणकर, राजा केरीपाळे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.