लोककला महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; माजी खा. निलेश राणेंच्या उपस्थितीत उद्या सांगता

मालवण : मालवण पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोककला महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. भजन, दशावतार, फुगडी यासह सादर करण्यात येत असलेल्या सर्वच लोककलांना उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली आहे. मंगळवारी संयुक्त दशावतारने महोत्सवात मोठी रंगात आणली. दरम्यान, लोककला महोत्सवाची सांगता बुधवारी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी दिली.

मंगळवारी लोककलावंत पुरुषोत्तम भास्कर खेडेकर (हिवाळे), सुहास मोहन माळकर (मालवण), गुणाजी विश्राम घाडीगांवकर (ओवळीये) यांना पंचायत समितीच्या वतीने विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पस सदस्य अशोक बागवे, मनीषा वराडकर, उद्योजक बाबा परब, हरीश गावकर, ओवळीये सरपंच अंबाजी सावंत, हिवाळे सरपंच पुरुषोत्तम खेडेकर, तळगाव उपसरपंच अनंत चव्हाण, श्रावण सरपंच प्रशांत परब, बांदिवडे सरपंच प्रविणा प्रभू, राठीवडे उपसरपंच मेस्त्री, सूत्रसंचालक विनोद सातार्डेकर यासह अन्य मान्यवर पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्रावण ग्रामपंचायत क्षेत्राच्या वतीने ‘फुगडी’ सादरीकरण करण्यात आले. यालाही उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात सहभागी सौ. पायल प्रशांत परब, सौ. स्वप्नाली सत्यवान परब, सौ. सुप्रिया अशोक यादव, सौ. रागिणी रामदास पवार, सौ. नूतन तुषार श्रावणकर, सौ. आरती देवेंद्र हावळ, कु. समृद्धी सत्यवान परब, सौ. ज्योती रतन बुटे, कु. देवयानी रतन बुटे, सौ. दिपाली दीपक पाटकर, सौ. प्रतीक्षा दीपक परब, कु. शुभ्र। प्रशांत परब, सौ. स्वप्नाली राजन यादव, सौ. अर्चना अनिल महाजनी यासह श्री. संजय लवराज चव्हाण (बुवा), कु. संकल्प संजय चव्हाण (ढोलकी वादक), कु. राज हरेश चव्हाण (चकी वादक) या सर्वांना तसेच गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ किर्लोस बुवा दशरथ घाडीगांवकर यांनाही प्रमाणपत्र देऊन पंचायत समिती मालवणच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!