विद्यार्थी आत्मविश्वास गमावायच्या अगोदर शाळा लवकर सुरु करा
मालवण : मुलांना परीक्षांमधुन मिळालेल्या गुणांचा आणि प्रवेश प्रक्रीयेचा टाळेबंद जुळत नसल्याने विद्यार्थी ,पालक संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे अशा परीस्थितीत शाळा लवकरात लवकर सुरु कराव्यात अन्यथा विद्यार्थ्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होईल, अशी भिती नॅशनल अँटी करप्शन अँड अँटी एक्ट्रॉसिटी टायगर फोर्स सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
दहावी ,बारावी परीक्षांमध्ये नव्वद टक्के गुण मिळवुनही चांगल्या काॅलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही ही भावना विद्यार्थ्यांना नैराश्या कडे नेणारी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामध्ये न मिळणारी रेंज हा मोठा अडसर असुन तो दुर करण्यापेक्षा शाळाच सुरु करा अशी भावना पालक व विद्यार्थी यांची झालेली दिसुन येते. सेतु अभ्यासक्रम ,चाचणी परीक्षा यांच्या बाबतीत मोबाईल रेंजचा अडसर असल्याने शिक्षकांना वाडी, वस्तीवर मुलांना प्रश्नपत्रिका पोहचवणे, उत्तरपत्रिका गोळा करणे यासाठी फिरावे लागत आहे. गेली दीड वर्ष शाळा बंद स्थितीत आहेत. या दीड वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे झालेलं शैक्षणिक नुकसान पुढील दशक भर चिंतेच वातावरण असेल. मोबाईलच्या अतिरिक्त वापराने होत असलेले डोळ्यांचे आजार ही एक गंभीर समस्या आहे. शिक्षकांना कोविड ड्युटी साठी वापरुन शिक्षण व कोविड ड्युटी यामध्ये होणारी शिक्षकांची ससेहोलपट थांबवावी, शाळा सुरु करत शिक्षकांना शिक्षण प्रवाहात आणुन, शाळेची घंटा लवकरात लवकर वाजवुन शासनाने विद्यार्थ्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आणावा अशी मागणी टायगर फोर्सच्यावतीने करण्यात आली आहे.